केडगाव हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकरला न्यायालयीन कोठडी

अहमदनगर/प्रशांत झावरे : अहमदनगर मधील केडगाव येथील शिवसैनिक दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी भानुदास कोतकर याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमोर हजर नयायाधीश डी. एस. कुलकर्णी यांनी आरोपी भानुदास कोतकरला न्यायालयीन कोठडी सुनावली. अहमदनगर येथील केडगाव हत्याकांडाचा कट रचल्याप्रकरणी भानुदास कोतकर येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी द्यायला आला असता पोलिसांनी तेथून सापळा लावून अलगद अटक केली होती.

केडगाव हत्याकांडाच्या दिवशीच मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याला मयत संजय कोतकर यांनी फोनवरून धमकी दिली हाेती. संदीप गुंजाळ याने धमकीचे संभाषण आरोपी विशाल कोतकरला ऐकवले होते, विशालने हे संभाषण माजी महापौर सुवर्णा कोतकर यांना एकवले. सुवर्णा यांनी या धमकीबाबत भानुदास कोतकरला फोनवरून ही माहिती दिली. तसे कॉल रेकॉर्ड पोलिसांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर फिर्यादीतही भानुदास कोतकर याच्याविरोधात हत्येचा कट रचल्याप्रकरणी १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुदास कोतकर याला अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली असून सध्या तो जामिनावर आहे. मात्र जामिनाचा गैरवापर केल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात ३०३ हे कलम (मृत्युदंड) लावले आहे. न्यायालयाने कोतकरला १९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर कोतकरला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. कोतकर याच्या वतीने अॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला.

सीआयडीकडे अद्याप चार्ज नाही

केडगाव हत्याकांडाचा तपास सीआयडीकडेवर्ग करण्यात आला असला, तरी सीअायडीने अद्यापतपासाचा चार्ज घेतलेला नाही. हा तपास अजून एसआयटीकडे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी दिलीप पवार यांनीच भानुदास कोतकर याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. सीअायडी या गुन्ह्याच्या तपासाचा चार्ज सोमवारी अथवा मंगळवारी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

You might also like
Comments
Loading...