धनगर आरक्षणासाठी औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून उधळणार भंडारा!

bhandara

औरंगाबाद : आत्तापर्यंतचे कुठलेच सरकार धनगर आरक्षण तसेच ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर राहिलेले नाही. त्यामुळेच आज पुन्हा एकदा धनगर समाजावर आरक्षण मागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सध्याचे महाविकास आघाडी सरकार देखील धनगर आरक्षणाबाबत संवेदनशील नाही असे दिसून येते. त्यामुळे येत्या १७ सप्टेंबर रोजी धनगर समाजाने आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवून भंडारा उधळण्यात येईल. असा ईशारा धनगर समाज क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात येणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांचा ताफा अडवून धनगर समाज आरक्षण आणि ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा उधळून मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे ईशारा धनगर समाज क्रांती मोर्चा, जन क्रांती संघ, ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. सरकार कोणतेही असो धनगर समाज आणि ओबीसी समाजाची नेहमीच दिशाभूल करण्यात आली आहे.

आत्ताचे महाविकास आघाडी सरकारही धनगर समाजीअसल्याच्या दिसून येत असल्याचा आरोप करत राज्यातील सर्वच मंत्री, राज्यमंत्री तसेच आमदार, खासदार यांना धनगर आरक्षण आणि ओबीसी समाजच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल जाब विचारला जाईल. जोपर्यंत आमचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडले जाणार नाही. तोपर्यंत जन आंदोलन सुरूच ठेऊ. असा ईशारा धनगर समाज क्रांती मोर्चा, जन क्रांती संघ, ओबीसी संघर्ष समिती, धनगर समाज उन्नती मंडळाचे डॉ. संदीप घुगरे, शिवाजी वैद्य, प्रभाकर करे, दीपक महानवर, ओबीसी नेते विष्णू वखरे आदी धनगर समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या