भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी; भाजपचे पटले पडले

भंडारा : भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे विजयी झाले आहेत.

भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव करून कुकडे 40 हजार मतांची आघाडी मिळवली आहे. आज मतमोजणी दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चढ-उतार पहायला मिळाले. सुरवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर होती. सहाव्या फेरीनंतर भाजपला आघाडी मिळाली.