भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक; तिसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर

ncp

भंडारा : भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान आज या पोटनिवडणूकीच्या मत मोजणीला सुरुवात झाली असून, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेल्या या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्यचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, तिसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर आहे तर भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर आहेत

– तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे
– पोस्टल मतमोजणीत भाजपा आघाडीवर
– मतमोजणीस प्रारंभ, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार