नाना पटोले की प्रफुल्ल पटेल ? कोण लढवणार भंडारा-गोंदियाच्या लोकसभेची जागा

टीम महाराष्ट्र देशा : गोंदिया-भंडाऱ्याच्या लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा होण्याचे चिन्ह आहेत. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत . आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवणार, त्याला पर्याय नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पोटनिवडणुकीसाठी गोंदियाच्या जागेवर दावा केला आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणूक लढवून नाना पटोले सत्तेवर आले. पटोलेंनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. मात्र, पटोलेंच्या आधी राष्ट्रवादीचे माजी खासदार प्रफुल्ल पटेल सलग 3 वेळा गोंदिया-भंडाऱ्यातून निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीही सहजासहजी ही जागा सोडणार नाही. त्यामुळे ही जागा नेमकं कोण लढवणार आणि कोणाविरोधात लढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...