भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक; मतमोजणीला सुरवात

EVM

भंडारा : भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान आज या पोटनिवडणूकीच्या मत मोजणीला सुरुवात झाली असून, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेल्या या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्यचं लक्ष लागलं आहे.

Loading...

निवडणुकीदरम्यान काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी याठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर काल या पोटनिवडणुकीसाठी ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात आलं.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत. भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे देखील तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्येच असल्याची चर्चा आहे.Loading…


Loading…

Loading...