fbpx

नितीन आगेच्या न्यायासाठी राज्यभर होणार आंदोलन

मुंबई : नितीन आगे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आंबेडकरी जनतेचं 1 जानेवारी 2018 पासून राज्यभरात भव्य आंदोलन उभारणार असल्याचा इशारा काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांनी सरकारला दिला आहे.यापूर्वी मुणगेकर यांनी कोपर्डी आणि आगे प्रकरणाच्या निकालांची तुलना करत कोपर्डी च्या निकालानंतर आनंद साजरा करणारे आगे प्रकरणाच्या निकालानंतर गप्प का होते असा सवाल उपस्थित केला होता .

येत्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला आगे कुटुंबियांच्या न्यायासाठी राजगृह ते चैत्यभूमी असा लाँग मार्च काढणार आहोत, अशी माहिती मुणगेकरांनी दिली.“आझाद मैदानातील आजच्या आंदोलनातही आगे कुटुंबीय सहभागी होणार होते. मात्र स्थानिक आमदारांनी नितीनच्या वडिलांवर दबाव आणून आंदोलनात पोहोचू दिले नाही.”, असा गंभीर आरोप भालचंद्र मुणगेकरांनी केला. शिवाय, 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धार कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही मुणगेकरांनी केला.खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणाची 2016 च्या सुधारित अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सुनावणी व्हावी, अशी मागणी भालचंद्र मुणगेकारांची केली आहे. शिवाय, हे.