भैय्यासाहेब आणि माझ्या संबधांना वारासुद्धा छेदू शकत नाही – धनंजय मुंडे

blank

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमेदवारीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत आमदार अमरसिंह पंडित यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. पण अशा चर्चा होत्या की अखेरच्या क्षणाला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपलं वजन बजरंग सोनावणे यांच्या पारड्यात टाकत पंडितांचा पत्ता कट केला. यामुळे मुंडे आणि पंडित यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, धनंजय मुंडे यांनी या वादावर पडदा टाकत भैय्यासाहेब आणि माझ्या संबधांना वारासुद्धा छेदू शकत नाही असं म्हणत आम्ही दोघे एकच आहोत असल्याचं सांगितलं आहे. बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ धोंडराई गावात सभा घेतली त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

दरम्यान, मागासलेल्या बीड जिल्ह्याला लागलेला उसतोड मजुरांचा जिल्हा हा कलंक जर पुसायचा असेल तर स्वकर्तृत्वाने आपले अस्तित्व निर्माण केलेल्या बप्पांना पाठिंबा द्या. अफवांवर नाही तर कष्टावर, कर्तव्यावर विश्वास ठेवा. असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

तर , बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सर्वात आधी भैय्यासाहेब अमरसिंह पंडित यांच्या नावाची सुचना मीच केली. जिल्हा परिषदेत आम्ही एकत्र निवडून आलो, तेव्हा पक्ष वेगळे असतील पण आमचा गहरा याराना होता. आजही आमच्या संबधांना वारासुद्धा छेदून जाऊ शकत नाही, तर हे कोण आहेत फुट पाडणारे ? असं मुंडे म्हणाले आहेत.