इंदोर : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदोर कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात कोर्टाने तीन जणांना दोषी ठरवले आहे. इंदोर जिल्हा न्यायालयाने सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि शिष्या पलक यांना दोषी ठरवले आहे. तिघांनाही प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतावर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. न्यायालयाने शिष्य पलक, शरद आणि विनय यांना आयपीसी कलम ३०६ अंतर्गत दोषी ठरवले आहे.
इंदोरमधील भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी या तीन आरोपींना जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती. त्यानंतरही हे तिघे मिळून महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याचे समोर आले होते. भैय्युजी महाराजांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेखही केला कारण ते भय्यूजींचे १६ वर्षांचे एकनिष्ठ सेवक होते.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वाद जगजाहीर झाला होता. पण नंतर तपास केला असता त्यांच्या जवळचे लोकच त्यांच्या जीवाचे शत्रू निघाले.
महत्वाच्या बातम्या:
- पीटरसनने पंतप्रधान मोदींच्या पत्राला दिले हिंदीत उत्तर! म्हणाला, “आदरणीय मोदीजी, मुझे…”
- वाईनच्या निर्णयावरून भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक, म्हणाले हे सरकार…
- श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानाला ‘अ’ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आराखडा तयार करा-अब्दुल सत्तार
- ‘कृत्रिम बहुमताने मिळालेली सत्ता…’; चंद्रकांत पाटलांची टीका
- औरंगाबादचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे का? हुजरेगिरीविरोधात भाजप करणार आंदोलन..!