एल्गार परिषदेच्या आयोजनावर माओवाद्यांचा पैसा, प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेस संशयाच्या भोवऱ्यात ?

पुणे: कोरगाव भीमा शौर्यदिनाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनावर पुणे पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ही परिषद आयोजित करण्यासाठी माओवाद्यांच्या पैसा लागल्याची माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली आहे. तर रोना विल्सन यांच्याकडून मिळालेल्या पत्रामध्ये भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसच्या नावाचा उल्लेख असल्याने तेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Loading...

पुणे पोलिसांनी काल मोठी कारवाई करत मुंबई , दिल्ली आणि नागपूर येथून अनेकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग, माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काल अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांचे माओवाद्यांशी कनेक्शन असून, सुरेंद्र गडलिंग आणि रोना विल्सन यांचे माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती रवींद्र कदम यांनी आहे. या सर्व संशयितांविरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचही ते म्हणाले. तर रोना विल्सन आणि शोमा सेन यांच्या झाडाझाडतीत माओवाद्यांचे पैसे एल्गार परिषदेत वापरले गेल्याचं पुरावे मिळाल्याच कदम यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांच्याशी संबंधित एक पत्र मिळाल आहे. मिलिंद तेलतुंबडे यांनी रोना विल्सन ला पत्र लिहलेले आहे. ज्यात काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख आहे. मात्र त्यांचा संबंध या लोकांशी आहे की नाही याचा तपास सुरू असल्याचही त्यांनी सांगितले.

मुंबई – डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली असून, हा खर्च भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटदरात येत्या 15 जूनपासून 18 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळाचा दरवर्षी साधारण 460 कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीटदरात 30 टक्के इतकी वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते.

मात्र प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी ही दरवाढ 30 टक्क्यांऐवजी फक्त 18 टक्के इतका करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान राज्य सरकारनं डिझेलवर करमाफी केल्यास एसटीचे तिकीट दर कमी करणार असल्याचं देखील महामंडळाच्या वतीन सांगण्यात आले आहे.Loading…


Loading…

Loading...