गांधीजींना त्यांच्याच मारेकऱ्यांच्या गोटात ढकलू नका – भाई वैद्य

पुणे – गांधीजींनी कधीकाळी चार्तुवर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला होता. पंरतू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे करार भेटी दरम्यान महात्मा गांधींनी चार्तुवर्ण व्यवस्था कशी अन्यायकारक आहे याची प्रचिती आली. त्यांच्या चुकीच्या भुमिकेचा पश्याताप म्हणुन गांधींनी सातत्याने तब्बल दहा महिने हरिजनांच्या उत्थानाचे कार्य केले. कधीकाळी चार्तुवर्ण व्यवस्थेचे समर्थन केले म्हणुन त्यांना त्यांच्याच मारेकऱ्यांच्या गोटात ढकलणे योग्य होणार नाही असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी आज व्यक्त केले.
संघ विचारधारेवर  कडाडून टीका
 ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य हे 22 जून रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्त त्यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला येथील महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा आणि संवाद, पुणे यांच्यातर्फे वैद्य यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्य़ासाठी सन्मान आणि मानपत्र सोहळा प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या सन्मानाला उत्तर देतांना वयाच्या नव्वदाव्यावर्षी देखील देशापुढील जटील प्रश्र्नांचा आढावा घेतांना भाई यांनी मनोगत व्यक्त करीत होते. माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भाईंचा सत्कर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रिय गृृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मधुकर भावे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर,अध्यक्ष उद्धव कानडे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कारचे मनोगत व्यक्त करतांना भाई वैद्य पुढे म्हणाले की, गांधींच्या बदलेल्या या भुमिकेचा सनातन्यांनी मनात राग धरला. त्यांच्या पश्यातापाच्या काळात सनतनी विचारधारेच्या लोकांनी त्यांच्यावर विखारी टिका केली पंरतू गांधीजी त्या विचारापारून नंतर परावृत्त झाले नाहीत. विश्रामबाग वाड्यातील गांधींच्या सत्काराच्यावेळीस गांधीवर कट्टरविचारधाराच्या लोकांनी त्यांच्यावर बाॅंम्ब टाकून त्यांनी जीवेमारण्याचा देखील प्रयत्न केला. पंरतू गांधीजी त्यातून थोडक्यात बचावले. जातींचे उच्चाटन हा जणू विडाच गांधींनी त्याकाळी उचलला होता. त्यामुळे गांधीजींना त्यांच्याच मारेकऱ्यांच्या गोटात ढकलू नका असं आवाहन वैद्य यांनी केलं
संघ विचारधारेवर भाई  प्रहार
भाई वैद्य पुढे म्हणाले की, शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान राहिलेले आहे. गोवा मुक्ती संग्रमापासून ते आजही विविध संघर्षाच्यावेळी आपण त्या प्रेरणेचे स्मरण करतो. पंरतू याच शिवाजी महाराजांवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महाराजांनी कल्यानच्या सुभेदाराच्या सुनेची ओटी भरून परत पाठवण्याच्या कृतीवर टिका केली होती. कारण शिवाजी महाराजांनी हिंदवीस्वराज्याची भाषा वापरली तर त्यांना हिंदुत्ववादाची भाषा आणि कृती अपेक्षित होती. 1925 पासून संघ आणि हिंदूत्ववाद्यांनी हिंदवीस्वराज्या एेवजी एकाच धर्मावर आधारीत असे हिंदुत्ववादी राष्ट्राची कल्पना मांडली होती पंरतूकी जातीवर, धर्मावर आधारीत राष्ट्राची उभारणी केल्यास काय परिस्थिती ओढावते हे ईस्लामीक राष्ट्रांच्या सध्याच्या परिस्थितीवरुन आपणांस लक्षात येईल. धर्माधिष्टीत राष्ट्रनिर्मीती भारताला विनाशाकडेच घेऊन अशी भीती देखील व्यक्त केली
00