मुंबई : केंद्र सरकारच्या जाचक नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं गेल्या ४८ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात पार पडली आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक बैठकी पार पडल्या. परंतु, या बैठकींमध्ये शेतकरी आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नव्हता.
केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानंही कडक भूमिका घेतलीय. केंद्र सरकारनं या कायद्यांना स्थगिती द्यावी अन्यथा सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देण्यात येईल, असं म्हणत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला फटकारलं होतं.
या आंदोलनावर आज देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे केंद्र सरकारला मोठा दणका बसला आहे. तसंच कृषी कायद्यांच्या पडताळणीसाठी-चर्चेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने देखील देशभरात आंदोलनं व निदर्शनं करून केंद्र सरकारच्या या कायद्यांचा निषेध केला होता. तर, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देखील काँग्रेसने पाठींबा दिला होता. आता या कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी, ‘जो शेतकरी देशाला अन्न पुरवू शकतो तो मदमस्त सत्तेचा अहंकार सुद्धा उधळू शकतो..!!’ असं ट्विट करून त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
जो शेतकरी देशाला अन्न पुरवू शकतो
तो मदमस्त सत्तेचा अहंकार सुद्धा उधळू शकतो..!!#FarmersProtest @INCMumbai— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) January 12, 2021
महत्वाच्या बातम्या
-
राज्यात पोपट, कावळे, बगळे मरतायत फक्त महाविकास आघाडी सुरक्षित; प्रविण दरेकरांची टीका
- १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा ‘या’ हॉस्पिटल्समध्ये होणार श्रीगणेशा
- काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पवारांसोबत खलबतं; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली वाढल्या !
- कंगना रनौत उतरणार राजकारणाच्या मैदानात?; ट्विटरवरून दिले संकेत
- ‘नारायण राणेंना खरा धोका त्यांचा दोन गुंडप्रवृत्तीच्या मुलांपासून