मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावरून भाई जगताप आणि संजय निरुपम भिडले

टीम महाराष्ट्र देशा : रविवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर संजय निरुपम यांनी देवरा यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

संजय निरूपम यांनी ट्विट करत म्हटले होते की, राजीनाम्यात त्यागाची भावाना अंतर्भुत असते, मात्र इथे तर दुसऱ्याच क्षणी राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे अशा आशयाच्या ट्वीटला जगताप यांनी उत्तर दिले आहे.

जगताप यांनी ‘काही नेते आपण काँग्रेसी असल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात ते जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि पुन्हा त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूकही लढवतात. इतके करुनही ते २.७ लाखांच्या मतांनी निवडणूकीत पराभूत होतात. अशा ‘कर्मठ’ नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे अस ट्वीट करून निरुपम यांचा समाचार घेतला आहे.Loading…


Loading…

Loading...