fbpx

‘सिम्बा’मुळे ‘भाईना स्क्रीन मिळेना,मराठी चित्रपटांची उपेक्षा सुरूच

टीम महाराष्ट्र देशा- निखळ विनोदाच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पु ल देशपांडे या लाडक्या व्यक्तिमत्वावर आधारित असलेला ‘भाई व्यक्ती आणि वल्ली’ हा चित्रपट उद्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अनेक पुलंचे चाहते हे ४ जानेवारी या दिवसाच्या प्रतीक्षेत आहेत. पण रसिकांच्या या आनंदाला नैराश्याचे डोंगर आडवे येणार आहेत. कारण ‘सिम्बा’ चित्रपटामुळे ‘भाई व्यक्ती आणि वल्ली ‘ या चित्रपटाला चित्रपटगृहच उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. सिम्बाच्या या घवघवीत यशामुळे थेटर मालक ‘भाई व्यक्ती आणि वल्ली’ या चित्रपटासाठी स्क्रीन देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा मराठी सिनेमा विरुद्ध हिंदी सिनेमा वाद होण्याची शक्यात्ता आहे. पु ल देशपांडेंचे चाहते उद्याच्या चित्रपटाच्या तिकीट बुकिंग साठी थेटर शोधात आहेत पण थेटर उपलब्ध नसल्याने चाहते नाराज असल्याचे दिसत आहे.

भाई व्यक्ती आणि वल्ली हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात पु ल देशपांडे यांचा संपूर्ण जीवनपट उलघडला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता ही ट्रेलर च्या लाईक्स आणि व्हिव्स वरूनचं पाहायला मिळते त्यामुळे प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट थेटर उपलब्धतेच्या भोवऱ्यात अडकल्याने प्रेक्षकांची नाराजी वाढत आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना याबात विचारले असता ते म्हणाले कि ‘सिम्बा चालतो तर चालू दे. पण आमच्या सिनेमाला एक तरी शो मिळायला हवा’ असं मत मांडलं आहे. मल्टिप्लेक्समध्ये मात्र आपल्याला शो मिळत असल्याचंही महेश मांजरेकर म्हणाले.
तसेच काशिनाथ घाणेकर’या चित्रपटाच्या बाबतीत देखील सिनेमा गृहांची उपलब्धता हा वादाचा विषय ठरला होता पण त्यावेळी राजकीय पक्ष चित्रपटाच्या पाठीशी उभे राहताना दिसले होते त्यामुळे आता कोणता राजकीय पक्ष धावणार आणि काय भूमिका घेणार, हे महत्वाचं ठरणार आहे.