सैन्याच्या बळावरच काश्मीरमध्ये शांतता ठेवणे शक्य- भागवत

mohan bhag rss

टीम महाराष्ट्र देशा- काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या बळावरच शांतता ठेवणे शक्य आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथे केले.जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले मोहन भागवत

जम्मू-काश्मीर आणि लद्दाखचा इतिहास मोठा आहे. त्यात देशाच्या संस्कृतीचा वारसा आहे. ती वाचवण्यासाठी सरकारकडून मदत होत असली तरी काही शक्ती त्यात कुरापती करत आहेत. त्यांना सैन्यशक्तीच्या जोरावरच उत्तर द्यावे लागणार आहे. काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या बळावरच शांतता ठेवणे शक्य आहे. भारत एक अंखड देश आहे व सर्व नागरिकांचा डीएनए एकच आहे.जम्मू-काश्मीरमधील युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना सरकारविरोधात भडकावले जात आहे. सैनिकांसह, सरकारी बसवर दगडफेक केली जात आहे. काश्मीरमध्ये जे काही आहे, ते सरकारचे आहे. त्यामुळे दगडफेकीतून होणारे नुकसान हे आपलेच नुकसान आहे हे सर्वाना पटवून सांगण्याची गरज आहे. सरकारची मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.Loading…
Loading...