खबरदार… तर भाजी व फळ विक्रेत्यांवर कारवाई होणार !

प्रदीप मुरमे : शहरात यापुढे रस्त्यावर व भाजी बाजारात दुकान किंवा गाडा लावून भाजी व फळांची विक्री करण्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मज्जाव करण्यात आला असल्यामुळे रस्त्यावर व बाजारात भाजी व फळांची विक्री करताना दुकानदार आढळल्यास त्या संबंधित विक्रेत्यावर कारवाई होणार.

जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरातील नागरीकांची सोय व्हावी म्हणून रस्त्यावर व भाजी बाजार येथे भाजी व फळे एका ठिकाणी थांबून विकण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु या भाजी खरेदीच्यावेळी बाजारात व गाड्यासमोर नागरीकांची मोठी गर्दी होत आहे. खरेदी करताना सोशियल डिस्टनसिंग पाळले जात नसल्याचे. सोशियल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होवू शकतो. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून खबरदारीची उपाययोजना म्हणून यापुढे शहरात भाजी बाजारात व रस्त्यावर गाड्यावर भाजी विकण्याला प्रशासनाने बंदी घातली आहे.

भाजी विक्रेत्यांनी शहरातील गल्ली व बोळात त्यांना निर्धारीत केलेल्या सकाळी ८ ते ११ यावेळेत भाजी व फळे विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या भाजी विक्रेत्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.