सतर्क राहा : राज्यात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा हवामान खात्याने दिला इशारा

सतर्क राहा : राज्यात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा हवामान खात्याने दिला इशारा

climate

मुंबई : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, जळगावसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने कहर माजवला असून हाताशी आलेलं पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, राज्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे धरणसाठ्यात चांगली वाढ होत आहे. अशातच, गणेशोत्सव काळात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया ला यलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान, उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या