fbpx

शिरूरमध्ये आढळराव क्लीन बोल्ड; अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय

टीम महाराष्ट्र देशा :संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील गाजलेल्या लढतीपैकी एक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला. आढळराव पाटील हे गेल्या ३ निवडणुकीपासून शिरूरमध्ये खासदार होते परंतु त्यांचा चौकार राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखला आहे.