fbpx

पंतप्रधान मोदींपेक्षा मुख्यमंत्री फडणवीसांच उत्तम काम – अन्ना हजारे

अण्णा हजारे

टीम महाराष्ट्र देशा : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं आहे असे वक्तव्य त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार राज्यात उत्तम काम करत आहे. असे मत अन्ना हजारे यांनी व्यक्त केले. इतकेच नव्हे तर, याचबरोबर, येत्या 17 जूनला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे देवेंद्र फडणवीस सरकारच शेवटचं अधिवेशन असेल. ज्यात लोकायुक्त कायदा पास होईल आणि राज्यातील भ्रष्ट मंत्री घरी जातील असा विश्वासही अण्णा हजारेंनी व्यक्त केला.इतकेच नव्हे तर महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त नियुक्ती केली जात आहे.