fbpx

मुंबईकरांचे हाल, बेस्ट कर्मचारी संपावर

मुंबई : बेस्ट कामगारांचा संप टळण्यासाठी गेले काही दिवस सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक न्यायालयातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच आव्हान दिले. यामुळे संतप्त कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होत आहेत.

लोकल वगळता मुंबईची आणखी एक लाईफ लाईन म्हणजे बेस्ट आहे. गेली अनेक वर्ष बेस्ट कर्मचारी आपल्या मागण्या प्रशासनापुढे मांडत आले आहेत. मात्र, पालिकेकडून नेहमी आश्वासनं मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बेस्ट कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं, ते ही पूर्ण केलं नाही, त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे.