अमिताभ बच्चन यांनी दिला दिला ‘बॉईज’ला आशीर्वाद

पुणे : सुप्रीम मोशन पिक्चर्सनिर्मित अवधूत गुप्ते प्रस्तूत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज सिनेमाच्या टिमला दस्तुरखुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी आशीर्वाद दिला. लालासाहेब शिंदे व राजेंद्र शिंदे निर्मित नुकताच (८ रोजी) प्रदर्शित झालेल्या बॉईजला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉईजमधील अभिनेते पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतिक लाड यांनी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठी सिनेमाचे भरभरून कौतुक केले. ‘मराठी सिनेमाने उंच भरारी घेतली आहे’ अशा शब्दात बिग बी बच्चन यांनी ट्विटरवरूनही शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉईजमधील डुंग्या म्हणजेच पार्थने बिगबी यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न केला होता. पार्थला २०१४ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बिग बी आणि पार्थ भालेरावचे भूतनाथ रिटर्नपासूनचे चांगले नाते आहे. बॉईज सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या सुमंतच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सनी लिओनने सादर केलेली बॉईजमधील लावणी सिनेमाला उंचीवर घेवून जाते. अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली सर्वच गाणी गाजली.आम्ही लग्नाळू या गाण्यावर रसिक थिएटरमध्ये नाचतांना दिसून आले.