fbpx

पुणे लघुपट महोत्सवात ‘गढूळ’ ठरला सर्वोत्कृष्ट

पुणे : नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार आणि आम्ही पुणेकर संस्थेतर्फे आयोजित ९ व्या पुणे लघुपट महोत्सवात पुण्यातीलच गणेश शेलार दिग्दर्शित ‘गढुळ’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक मिळाले. तर प्रशांत गोखले यांच्या अम्मी या लघुपटास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक विकास पाटील, मराठी चित्रपट परिवाराचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

भाग्यश्री देसाई निर्मित ‘वैशाख’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारिातेषिक मिळाले, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसरे पोरितोषिक गढुळ या लघुपटासाठी गणेश शेलार यांना मिळाले. सर्वोत्कृष्ठ छायाचित्राणसाठी लिमिटलेस या लघुपटाचे कॅमेरामन राधेय तावरे यांना पारितोषिक देण्यात आले. अम्मी या लघुपटाचे संकलन सर्वोत्कृष्ठ ठरले. गन्स अून्ड लव्हर्स या लघुपटासाठी पटकथेचे पारितोषिक संजय शास्त्री यांनी पटकाविले. अ‍ॅनिमेशन विभागामध्ये तथास सिक्रेट लघुपट सर्वोत्कृष्ठ ठरला. अरमान दुआ दिग्दर्शित पता लघुपटाला विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ठ लघुपटाचे पारितोषिक मिळाले. माहितीपटाचे पारितोषिक बंगळुरु येथील प्रवीण पिल्ले यांच्या ड्रिमर्स ऑफ ब्रेसवाना या लघुपटाला मिळाले तर सर्वोत्कृष्ठ कथेचे पारितोषिक गोव्यातील गोपीनाथ चांडेलकर यांच्या सिटी या लघुपटाने पटकाविले.

प्रकाश मगदुम म्हणाले, लघुपटातून विविध विषय हाताळले जात आहे, यासा’ी रनिर्मात्यांनी आपल्या मातीतील विषय मांडले पाहिजे. मेघराज राजेभोसले म्हणाले, लघुपट निर्माते आणि दिग्दर्शकांना भविष्यामध्ये संधी देण्यासा’ी विविध योजनांची गरज आहे. विकास पाटील म्हणाले, लघुपटांना योग्य बाजारपे’ निर्माण करण्यासा’ी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासा’ी सर्व निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे.