व्हेनेझुएलात फडकला मराठी झेंडा

jaybhim shinde best music director

दीपक पाठक : व्हेनेझुएला देशात झालेल्या फाइव्ह कॉंटिनेंटल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पल्याडवासी’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्तम संगीत दिगदर्शनाचा पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्करसोबतच जयभीम शिंदे यांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीच्या क्षितिजावर एका नव्या संगीत दिग्दर्शकाचा उदय झाला आहे.

व्हेनेझुएला देशात फाइव्ह कॉंटिनेंटल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला .प्रगती कोळगे यांनी दिगदर्शन केलेल्या पल्याडवासी या सिनेमाच्या संगीताने सर्वांनाच मोहिनी घातली .या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन जयभीम शिंदे याने केलं आहे. जयभीम हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील परांड्याचा असून  सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे “संगीत विद्यार्जन पद्धती आणि अपेक्षीत बदल” या विषयावर तो श्रीमती डॉ.वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एच. डी करत आहेत

यापुर्वी जयभीम शिंदे याने अनेक पुरस्कार प्राप्त लघुपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे . तसेच अनेक राज्यनाट्य स्पर्धा, ऐतिहासिक नाटके, अल्बम, शीर्षक गीते, जाहिराती इत्यादीचे संगीत दिग्दर्शन केले आहे . चित्रपट संगीत दिगदर्शनासाठी मिळालेला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा पहिला पुरस्कार त्याने  कुटुंब आणि  मित्र परिवाराला अर्पण केला आहे.