तालांची गुंफण असलेल्या तालमालेने सजला ‘कथकोत्सव’

katthak 1a

पुणे : गुरु-शिष्यांनी सादर केलेल्या विविध तालांची गुंफण असलेल्या कथक नृत्याच्या अप्रतिम नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे आणि त्यांच्या शिष्या तेजस्विनी साठे यांनी रुपक, मत्त, रुद्र, रास या चार तालांची गुंफण असलेल्या तालमालेतून कथक नृत्याची मोहिनी रसिकांवर घातली. पखवाज, बासरी आणि सतार या वाद्यांच्या एकत्रित वादनावर आधारित वाद्यरंग नृत्यप्रकार तसेच भारतीय वाद्य आणि पाश्चात्य ड्रम्सचे एकत्रीकरण असलेल्या अंतरनाद या चौतालाचे सादरीकरण अशा अविस्मरणीय कथक नृत्यरचनांचा नजराणा तेजस्विनी साठे आणि शिष्यांनी रसिकासमोर ठेवला.

Loading...

kathhak

शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल आॅफ कथक संस्थेच्या सतराव्या वर्धापनदिनानिमित्त कथकोत्सव २०१७ कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठ ललित केंद्र विभागाचे प्रमुख प्रविण भोळे, भारती विद्यापीठाच्या कला विभागाचे प्रमुख शारंगधर साठे, रवींद्र दुर्वे आदी उपस्थित होते.

katthak 1







Loading…










Loading…

Loading...