Share

Best Electric Scooter | जबरदस्त रेंजसह उपलब्ध आहेत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर

टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा ट्रेंड सुरू आहे. देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर सतत आपले नवीन मॉडेल्स लाँच करत असतात. यामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला जबरदस्त रेंज देतील.

Ola S1

Ola S1 (180km) ही देशातील सर्वोत्तम रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Ola च्या या स्कूटरचे बाजारात दोन प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. Ola S1 ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जर 180km पर्यंत रेंज देऊ शकते. सध्या ही स्कूटर बाजारामध्ये 10,000 रुपयांच्या डिस्काउंट उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स-शोरुम किंमत 1.40 लाख रुपये आहे.

Hero Electric Optima CX

Hero Electric Optima CX या हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 52.2V, 30Ah फॉस्फेट बॅटरी उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये अनेक आकर्षक फीक्चर्स आहेत. यामध्ये क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, रिमोट लॉक, यूएसबी चार्जिंग पोर्ट, अँटी थेफ्ट अलार्म, वॉक असिस्ट फंक्शन यांचा समावेश होतो. ही इलेक्ट्रिक स्कूटर एक चार्जवर 140 km पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे.

Hero Vida

हिरोने अलीकडेच Hero Vida चे दोन व्हेरियंट लाँच केले आहे. यामध्ये V1 Plus आणि V1 Pro यांचा समावेश आहे. 3.94kWh लिथीयम-आयन बॅटरी पॅक या उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्ज मध्ये 165 km उत्तर रेंज देऊ शकते. हिरोच्या या स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 1.58 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचा ट्रेंड सुरू आहे. देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now