आदर्श व्यापारी पुरस्कार पारस ग्रुपला

 

पुणे : दि पुना मर्चंटस चेंबरतर्फे  व्यापारमहर्षी स्व.उत्तमचंदजी पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी आदर्श व्यापारी पुरस्कार दिला जातो.यंदाचा राज्यस्तरीय आदर्श व्यापारी पुरस्कार अहमदनगर च्या मे.पारस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक पेमराज बोथरा  यांना जाहीर करण्यात आला आहे.तसेच पुणे शहर व  जिल्हा स्तरीय पुरस्कार मे.पी.एन.गाडगीळ अॅन्ड सन्सचे संचालक गोविंद विश्वनाथ गाडगीळ यांना तर चेंबरच्या सभासदांमधून देण्यात येणारा आदर्श व्यापारी पुरस्कार झुंबरलाल ललवाणी यांना देण्यात येणार आहे. कै.विरेन गावाडीया यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार जेष्ठ पत्रकार गणेश वाघमोडे गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिनांक ६ सप्टेंबर २०१७ रोजी अण्णाभाऊ साठे  रंगमंदिर पद्मावती येथे  सांयकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. राज्याचे सहकार  व पणनमंत्री सुभाष देशमुख हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर ,अन्न व औषध  प्रशासन मंत्री गिरीश बापट विशेष अतिथी म्हणून या बरोबरच खासदार अनिल शितोळे व महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत.