fbpx

आला उन्हाळा तब्ब्येत सांभाळा,ताक प्या,रहा निरोगी

टीम महाराष्ट्र देशा- दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिकपेय आहे. ताकात पोट्याशियम, कॅल्शीयम, मग्नेशिअम, झिंक, लोह, फॉस्फरस, इत्यादी खनिजे, रायनोप्लोरीन व्हिटामिन, फोलेट  “अ”, “ब” समूह “ड” व “क” ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात.

ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते. ताकाच्या रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते.ताक शरीरातील उष्णता कमी करूनशरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

ताक पिण्याचे फायदे

१. ताकात थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
२. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी कमी होते.
३. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
४. ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
५. महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.