मुंबई : बंगालचा दिग्गज फलंदाज आणि राज्याचा क्रीडा मंत्री मनोज तिवारीने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) मध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आहे. तिवारीने मध्य प्रदेशविरुद्ध सुरू असलेल्या उपांत्य फेरीत शानदार शतक झळकावले आणि त्यानंतर ते अनोख्या पद्धतीने साजरे केले. शतक झळकावल्यानंतर तिवारीने खिशातून एक कागद काढला, ज्यावर त्याने आपल्या पत्नीचे नाव तसेच मुलांचे नाव लिहिले होते. या नोटच्या माध्यमातून त्याने प्रत्येक कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या कुटुंबीयांचे आभार मानले.
तिवारी फलंदाजीला आला तेव्हा बंगालचा संघ ५४ धावांवर पाच विकेट गमावून अडचणीत सापडला होता. त्यानंतर त्याने युवा अष्टपैलू शाहबाज अहमदसह डाव सांभाळला आणि दोघांमध्ये १८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिवारीने २११ चेंडूत १२ चौकारांसह १०२ धावांची शानदार खेळी खेळली. तिवारीचे रणजी करंडकातील बाद फेरीतील हे दुसरे शतक आहे. याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीतही शतक झळकावले होते.
Manoj Tiwary shows a handmade note after scoring the century to appreciate his family. pic.twitter.com/Q51dSd5xkj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 16, 2022
मध्य प्रदेशने पहिल्या डावात ३४१ धावा केल्या होत्या ज्यात हिमांशू मंत्रीने सर्वाधिक १६५ धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरात बंगालचा डाव २७३ धावांवर संपला. तिवारीच्या शतकाशिवाय शाहबाज अहमदनेही ११६ धावांची शानदार खेळी खेळली. दुसऱ्या डावात मध्य प्रदेशने २३ धावांवर पहिली विकेट गमावली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मध्य प्रदेशने १६३/२ धावा केल्या आहेत. मध्य प्रदेशकडून रजत पाटीदार नाबाद ६३ आणि आदित्य श्रीवास्तव नाबाद ३४ धावांवर खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –