गुणकारी आलं…

टीम महाराष्ट्र देशा : आलं हे अतिशय औषधी आहे. पण बरेच लोकांना आलं फक्त चहात टाकण्यापुरतेच मर्यादित आहे एवढेच माहिती आहे. आलं उन्हामध्ये चांगले वाळवले कि त्याची सुंठ तयार होते. आले आयुर्वेदामध्ये वायुनाषक म्हणून प्रसिद्ध आहे. भारत आणि इतर देशांमध्ये आल्याचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

औषधी आलं

  • खोकला असेल तर आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीन चार वेळा घ्यावा. सर्दी असेल तर आल्याचे तुकडे टाकण पाणी उकळवावे. आले टाकून केलेल्या चहाने सुद्धा सर्दी बरी होते.
  • आले वेदनाशामक आहे. डोके दुखत असेल तर आले पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप करून कपाळावर लावावा. याने दाढ दुखणे ही थांबते. कान दुखत असेल तर आल्याचा रस 2-3 थेंब कानात टाकावा.
  • अपचन, पोटात गुबारा धरणे, पोट दुखणे, आणि इतर पचन विकार यांवर आले अत्यंत गुणकारी आहे. पचन विकार होऊ नये यासाठी जेवण झाल्यानंतर रोज आल्याचा तुकडा चावून खावा. त्यामुळे तोंडामध्ये चांगली लाड सुटते. आणि दायास्टेज नावाचा पाचक रस पाझरायला मदत होते.
  • डायबिटीज अर्थात मधुमेहाचा त्रास असेल, तर दररोज सकाळी आल्याचं पाणी प्यायल्यास साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहू शकतं.
  • आले आणि सुंठ असे आल्याचे दोन प्रकार आहे. चीनी स्वयंपाकात आले मासाल्याचा पदार्थ म्हणून जास्त प्रमाणात वापरतात. आल्याचे तेल सुगंधी द्रव्यात आणी औषधी मध्ये वापरतात.

फणसाचे हे गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर…