नोटबंदीमुळे हे बदलले; पंतप्रधान मोदींनी शेअर केली शॉर्ट फिल्म

टीम महाराष्ट्र देशा: ८ नोव्हेंबर म्हणजे आजपासून बरोबर एकवर्ष आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात पाचशे हजाराच्या नोटा रद्द करत नोटबंदी जाहीर केली होती. मुख्यतःहा हा निर्णय जाहीर करताना काळ्या पैसाला आळा घालणे, वाढता दहशवाद याला लगाम आणि आणखीन बरीच काही कारणे दिली गेली. मात्र एक वर्षांनंतर खरच नोटबंदीचा खरा उद्देश साध्य झाला का हा प्रश्नच आहे.

आज देशभरात कॉंग्रेस सह सर्वच विरोधी पक्षांकडून नोटबंदीच्या वर्ष पुर्तीवर काळा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तसेह अनेक ठिकाणी याच वर्षश्राद्ध देखील घालण्यात आल आहे. मात्र या सर्वामध्ये पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी का केली गेली आणि याचा काय फायदा झाला याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.