कर्जमाफीची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, याबाबत सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशी ओळख असलेल्या मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करीत असून राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त 2 लाख 49 हजार 818 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून यात यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. या जिल्ह्यातील 2 लाख 42 हजार 471 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच 23 हजार 505 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र

अहमदनगर – 2 लाख 869

औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322

बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818

गडचिरोली – 29 हजार 128

जळगाव – 1 लाख 94 हजार 320

लातूर – 80 हजार 473

नागपूर – 84 हजार 645

नाशिक – 1 लाख 36 हजार 569

परभणी – 1 लाख 63 हजार 760

रत्नागिरी – 41 हजार 261

सिंधुदुर्ग – 24 हजार 447

वाशिम – 45 हजार 417

अकोला – 1 लाख 11 हजार 625

बीड – 2 लाख 8 हजार 480

चंद्रपूर – 99 हजार 742

गोंदिया – 68 हजार 290

जालना – 1 लाख 96 हजार 463

मुंबई शहर – 694

मुंबई उपनगरे – 119

नांदेड – 1 लाख 56 हजार 849

उस्मानाबाद – 74 हजार 420

पुणे – 1 लाख 83 हजार 209

सांगली – 89 हजार 575

सोलापूर – 1 लाख 8 हजार 533

यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471

अमरावती – 1 लाख 72 हजार 760

भंडारा – 42 हजार 872

धुळे – 75 हजार 174

हिंगोली – 55 हजार 165

कोल्हापूर – 80 हजार 944

नंदुरबार – 33 हजार 556

पालघर – 918

रायगड – 10 हजार 809

सातारा – 76 हजार 18

ठाणे – 23 हजार 505