मुंबई: खरीप हंगामाला आत्ता काही दिवसातच सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. शेतकरी बियाणे आणि खताचे नियोजन करताना दिसत आहे. पण काही ‘कृषी सेवा केंद्र’ शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसतात. शेतकऱ्यांना जास्त किमतीमध्ये बोगस बियाणे देखील देतात. हंगाम सुरु झाला की खतांचा तुटवडा निर्माण होऊन खतांच्या किमतीत वाढ केली जाते. पण आता शेतकऱ्यांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही भारत सरकारने खताच्या साठ्याविषयी सर्व माहिती देणारी एक वेबसाईट बनवली आहे.
खते, बियाणे या गोष्टी घेताना बऱ्याचवेळा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता तुम्हाला एखाद्या बाजारपेठेमध्ये जाऊन तिथल्या कृषी सेवा केंद्रात खताचा साठा किती प्रमाणत उपलब्ध आहे याची माहिती घेता येणार आहे.
भारत सरकारने आता खत मंत्रालयाच्या माध्यमातून देश तसेच राज्यातील खताच्या साठ्याविषयी सगळी माहिती देणारी fert.nic.in ही वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून दुकानात खताचा किती साठ उपलब्ध आहे याची माहिती देखील मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये एकंदरीत किती खताची आवश्यकता आहे? शिवाय खरिप हंगामात कोणत्या पिकासाठी किती खाताचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व गोष्टी देखील या वेबसाईटवर पाहता येणं शक्य आहे.
महत्वाच्या बातम्या :