आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली; उदयनराजेंच्याच स्टाईलमध्ये पवारसाहेबांचा टोला

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांना मिश्कील टोला मारला. ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत पवारांनी राजे स्टाईलवर शाब्दिक फटकारे मारले.

साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पेटले आहे. खासदार उदयन राजे समर्थक आणि विरोधक यांच्या नेहमीच शाब्दिक युद्ध होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा शाब्दिक चकमक होत असते.

याचं मुद्द्यावरुन पत्रकारांनी शरद पवारांना जिल्ह्यात पक्षांतर्गत निर्माण झालेल्या पेचाबाबत प्रश्न विचारला असता. पवारसाहेब म्हणाले, “काही पेचबीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं. उतारा काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी असते ती कॉलर अशी होते” अशी शाब्दिक टिपणी करत पवारांनी उदयनराजेंप्रमाणे उभी असणारी कॉलर पवारांनी खाली करुन दाखवली.

शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. दरम्यान ते पत्रकार परिषदेत होते. शरद पवार यांनी पहिल्यांदाच उदयनराजेंच्या स्टाईलवरुन मिश्किलपणे भाष्य केले.

You might also like
Comments
Loading...