महात्मा गांधींचा ‘ अहिंसा ‘ हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

टीम महाराष्ट्र देशा: सध्य परिस्थितीत कोणत्याही कारणासाठी संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना संबोधित केलं .

सध्या भारतभर अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यात आंदोलनं होत आहेत. काही भागांत आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचं विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.

भारताचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या,स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करतात.त्यातून देशाला काय संदेश द्यायचा आहे तो दिला जातो. यावर्षी राष्ट्रपतींनी देशाला शांततेच आवाहन केल आहे.