जुआन कार्लोसचा अद्भुत गोल तुम्ही पाहिलात का? 

juan carlos

टीम महाराष्ट्र देशा- स्पॅनिश सेगुंदा डिविजन मॅचमध्ये गोलकीपरच्या अफलातून खेळाची झलक नुकतीच पाहायला मिळाली.जुआन कार्लोस Juan Carlos या गोलकीपरच्या अचूक टायमिंग मुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला .गिजोन आणि ल्यूगो या दोन्ही संघांमध्ये इस्टादिओ अँक्सो कॅरो Estadio Anxo Carro या स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात ७९ व्या मिनिटाला सामन्यातील सर्वात रोमहर्षक क्षण दिसला. एका गोलपोस्टच्या जवळून जुआनने मोठ्या कसबीने फुटबॉलचा चेंडू थेट प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये नेऊन पोहोचवला.

https://twitter.com/yousefteclab/status/954841226410385409

सोशल मीडियावर अनेकांनीच जुआनच्या खेळाचे आणि त्याच्या फुटबॉल कौशल्याची प्रशंसा केली आहे. मुख्य म्हणजे गोलपोस्टच्या दिशेने जुआनने हटके अंदाजात बॉल मारल्यानंतर त्याच्या टीममधील खेळाडूंनाही काही क्षणांसाठी त्या प्रसंगावर विश्वास बसत नव्हता. पण, कितीही अविश्वसनीय असली तरीही या ‘अजब गोलची गजब कहाणी’ सध्या अनेकांच्या मनात ‘गोल’ करुन राहिलीये असे म्हणायला हरकत नाही.