विश्वास हीच माझी जादूची कांडी, याच कांडीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी रिकामी केली : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतीगृहाच्या मैदाानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील विकास कामांबद्दल माहिती दिली त्यांनी माहिती दिली.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी जादूची कांडी म्हणजे विश्वास आहे. त्यामुळेच लोक आपलेसे होत आहेत. या जादूच्या कांडीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी रिकामी केली. त्यामुळे अभिनय व भाषणे यांचे क्लासेस आमच्या भावांनी घ्यावेत एवढंच काम त्यांना आता शिल्लक आहे. धोकेबाजांसाठी जर ऑलिम्पीक स्पर्धा निघाली तर यामध्ये ते निश्चित पहिले येतील.

ज्यांना काटा लावताना शेतकरी दिसत नाही अशांना आता शेतकऱ्यांचा पुळका आला आहे अशी नाव न घेता सोनवणे यांच्यावर त्यांनी टिका केली. बीड जिल्ह्यात केलेल्या विविध विकास कामांचा पाढा त्यांनी उपस्थितांसमोर वाचून दाखविला. याच वंजारी वसतिगृहात मुंडे साहेब शिकले. त्याचा प्रांगणात सभा घेऊन त्यांची प्रेरणा आम्ही घेत आहोत असेही त्या म्हणाल्या.