‘हायप्रोफाईल असल्याची किमंत चुकवावी लागते’; आर्यन खान प्रकरणी जावेद अख्तरांची प्रतिक्रिया

‘हायप्रोफाईल असल्याची किमंत चुकवावी लागते’; आर्यन खान प्रकरणी जावेद अख्तरांची प्रतिक्रिया

मुंबई :  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी २ ऑक्टोबरला अटक करण्यात आले. आर्यनच्या अटकेनंतर त्याच्या अडचणीत शाहरुखच्या अडचणीत अधिकच वाढ झाली. मात्र तरी देखील बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांकडून पाठींबा मिळाला. यातच आता जावेद अख्तर यांनी देखील बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींना तपासाच्या नावाखाली जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचे म्हंटले आहे.

जावेद अख्तर यांनी मुंबईत चेंजमेकर्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी शाहरुखाला पाठींबा देत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी एका बंदरावर एक अब्ज डॉलर्स किमतीचे कोकेन सापडले होते. तर दुसरीकडे त्याचवेळी एका क्रूझवर १२०० लोकांची तपासणी केली जाते. त्यावेळी त्या ठिकाणी दीड लाख किंमतीचे चरस सापडतो. क्रूझवर अंमली पदार्थ सापडले ही एक मोठी राष्ट्रीय बातमी होते. मात्र दुसरीकडे अब्ज डॉलर्स कोकेन सापडले त्याची साधी हेडलाईनही कुठे पाहायला मिळत नाही,’ असे जावेद अख्तर यांनी म्हंटले आहे.

यापुढे जावेद अख्तर म्हणाले, “बॉलिवूड इंडस्ट्री हायप्रोफाईल असल्याची किंमत चुकवत आहे. जेव्हा तुम्ही हायप्रोफाईल असता, त्यावेळी तुम्हाला खाली खेचण्यास, तुमच्यावर दगडफेक करण्यास, चिखलफेक करण्यास सर्वांना आनंद मिळतो. पण जर तुम्ही कोणीही नसाल, तर मग तुमच्यावर चिखलफेक करण्यास कोणाला आनंद मिळेल?” असा सवालही जावेद अख्तर यांनी उपस्थित केला. दरम्यान, आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये असून, आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सध्या आजच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असून आर्यन जेल होणार की, सुटका हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या