fbpx

मागासवर्गीय असल्याने मला सतत शिव्या दिल्या जातात : मोदी

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या पाच वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा डाग आमच्यावर लागलेला नाही. काळापैसा आणि भ्रष्टाचारावर आम्ही थेट वार केला आहे. देशाचे नामदार प्रत्येकाला शिव्या देत आहेत.आगोदर फक्त चौकीदाराला शिव्या दिल्या. आता सगळे मोदी चोर आहेत, असे म्हणत आहेत. मागासवर्गीय असल्याने मला सतत शिव्या दिल्या जातात. सगळ्याच मागासवर्गीयांना हे आता शिव्या देत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

अकलूज (ता़ माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.दरम्यान,यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ”देशात मजबूत सरकार पाहिजे. २०१४ मध्ये तुम्ही पूर्ण बहुमत दिल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलो. गरिबांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. देशाला मजबूत सरकार देणार की कमजोर सरकार देणार हे आता तुम्ही ठरवायचे आहे. देशाचा चौकीदार सतर्क आहे असे ते म्हणाले.

माढ्यातील लोकांना मजबूत हिंदुस्थान पाहिजे की मजबूर, असा प्रश्न देखील मोदींनी उपस्थितांना केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त हे माझ्याविरूद्ध लढत आहेत. या देशाला भविष्यात कुठे घेऊन जाययचे याबाबतचा अजेंडा विरोधकांकडे नाही. विरोधकांकडून यंदाच्या निवडणुकीत फक्त एकच नारा देण्यात येत आहे तो म्हणजे मोदी हटाव… मोदी हटाव…असे मोदी म्हणाले.