२०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू-अमित शहा

amit shaha

 टीम महाराष्ट्र देशा : २०१४ मध्ये ज्या पद्धतीन राम मंदिर अयोध्येत बांधू असं आश्वासन दिलं. आणि त्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेत आलं आता २०१९ मध्ये ही अमित शहा राम मंदिराचा मुद्दा घेऊनचं लोकसभेची तयारी सुरु केलीय. हैद्राबाद येथे नेत्यांसमवेत झालेल्या सभेत त्यांनी २०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू अशी घोषण केली.

सत्ताधारी पक्षानेच काल राम मंदिरावरून केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरन तापण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना ते म्हणले की २०१९ पूर्वी राम मंदिर बांधण्यासाठी योग्य ती पावले उचलू. तेलंगना राज्याच्या कार्यालयात ही बैठक संपण झाली. आज पर्यंत राम मंदिर हे वादविवादात अडकले होते. मात्र आता २०१९ पूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरु होईल. अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. ही माहिती भाजपा नेते पी. शेखर यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

जो पक्ष किंवा जी लोकं आज पर्यंत राम मंदिराला विरोध कराचे, तीच लोकं आता मंदिर बांधायच्या विषयावर बोलतात. हा एक प्रकारचा कट ही असू शकतो? त्यामुळ जनतेन सतर्क रहायला हवं. थोडे दिवस धीर ही धरायला हवा. अयोध्येत राम मंदिर नक्की होईल असं वक्तव्य देखील उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी केलं होत याचबरोबर प्रभू रामाची कृपा झाल्यावर राम मंदिर बांधू संत समुदायाने थोड्या दिवस धीर धरून संयम बाळगायला ही आदित्य नाथ यांनी सांगितल.

आम्ही राम मंदिर बांधू शकत नाही, मोदींच्या मंत्र्याच मोठं विधान

देशातील जनतेने ‘मत’ राम मंदिरासाठी दिले होते; ट्रीपल तलाख साठी नव्हे- प्रविण तोगडियाLoading…
Loading...