IND vs Pak | नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच महत्त्वाचा असतो. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे रविवारी पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने आलेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील हाऊसफुल्ल स्टेडियमवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माचा कर्णधार म्हणून विश्वचषकातील पहिला सामना होताच तो भावूक झाला.
भारतीय राष्ट्रगीतादरम्यान रोहित शर्मा भावूक झाला. यावेळी त्याचा चेहराही उदास झाला. राष्ट्रगीत संपल्यावर रोहित शर्माने भावनिक झालेला चेहऱ्यावरचे हावभाव लपवण्यासाठी डोळे पूर्णपणे बंद केले. शेवटी तो स्वत:ला रोखू शकला नाही. त्याचे डोळे त्याच्या भावूक झाल्याची कहाणी सांगत होते. यावेळी रोहित शर्माच भावूक होण्यामागच कारण आहे. भारताचं राष्ट्रगीत. भारतीय राष्ट्रगीताचे शब्द ऐकताच रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी आलं.
राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माने आपले डोळे बंद केले व भावनांवर नियंत्रण ठेवलं. राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्मा डोळे बंद करुन उभा होता. त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे भाव होते. त्याने कसंबसं स्वत:ला इमोशनल होण्यापासून रोखलं. पण अखेरीस रोहितच्या डोळ्यात पाणी दिसलच. रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
महत्वाच्या बातम्या :
- Brahamastra | रणवीर आणि आलियाचा सुपरहिट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच होणार OTT रिलीज
- IND VS PAK | भारताची खराब सुरवात! पहिल्या 7 ओव्हरमध्ये 4 खेळाडू तंबूत
- IND VS PAK | शमीची अप्रतिम कामगिरी! 5 चेंडूत 4 षटकार ठोकणाऱ्या इफ्तिखारला रोखले
- T20 World Cup | 2 वेळा T20 World Cup चॅम्पियन वेस्टइंडीज झाली वर्ल्ड कप मधून बाहेर, जाणून घ्या कारण
- India vs Pakistan | भारताने पाकिस्तानला 159 धावांवर रोखले, अर्शदीप-हार्दिकचा भेदक मारा