लोकसभा निवडणुकीआधी भाजपविरोधात ‘महाआघाडी’ व्यवहार्य नाही : शरद पवार

शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा – भाजपविरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी आणि विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत मात्र लोकसभा निवडणुकीआधी भाजपविरोधात ‘महाआघाडी’ व्यवहार्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.पवार यांच्या या विधानामुळे कॉंग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

लोकसभा निवडणुकीआधी भाजपविरोधात ‘महाआघाडी’ व्यवहार्य नाही, लोकसभा निवडणुकीबाबत बरेच अंदाज आणि शक्यता मीडियातून व्यक्त केल्या जात आहेत. राजकीय पर्यायाबाबत लिहिले जात आहे. आमच्या काही मित्रांना ‘महाआघाडी’ निवडणुकीआधी तयार व्हावी, असे वाटत आहे. पण मला तरी तशी शक्यता अजिबात दिसत नाही. मात्र निवडणुकीआधी ‘महाआघाडी’ तयार झाली नाही तरी निवडणुकीनंतर भाजपविरोधी साऱ्या शक्ती हमखास एकवटतील.