औरंगाबाद : उद्धव ठाकरेंच्या सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. आता तो दिवस आला आहे. आज औरंगाबाद शहरात 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे सभेपूर्वीच आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. तसेच आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असे शिवसेनेने म्हंटले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी भाजपकडून शिवसेनेच्या कारभाराचे धिंडवडे उडवायला सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसेना नेत्यांनी औरंगाबादमधील वातावरण भगवेमय केले आहे. चौकाचौकात भगवे झेंडे, मोठे बॅनर्स आणि भगव्या रंगाचे पट्टे शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. मात्र आता याच ठिकाणी भाजपकडून शिवसेनेविरोधात बॅनर्स लावले जात आहेत. भाजपकडून शिवसेनेच्या औरंगाबाद महानगरपालिकेतील कारभाराचे धिंडवडे काढणारे बॅनर्स लावायला सुरुवात झाली आहे. ज्या ठीकानी शिवसेनेने भगवे झेंडे, मोठे बॅनर्स लावले आहेत त्याच ठिकाणी भाजपनेही बॅनर्स लावले आहेत.
शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये आठ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या पाश्वर्भूमीवर उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “आज औरंगाबादमधील पाणीप्रश्नाचा वर्धापनदिन आहे का?, संभाजीनगर नामकरणाच्या आश्वासनाचा वर्धापनदिन आहे का?”, असे सवाल भाजपने बॅनर्सच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<