मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मोदींच्या दोन बड्या मंत्र्यांचा राजीनामा

rajiv pratap rudy and uma bharti

नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांच्या सुचनेनंतर रुडी यांनी राजीनामा दिला आहे. रुडी यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवणार असल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याचं बोललं जातं आहे.
त्याचबरोबर केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे . उमा भारती प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. मात्र भरती यांच्या कामावर मोदी नाखूष असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. तर दुसरीकडे आणखीन 3 ते 4 केंद्रीय मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याच बोललं जातं आहे.

वास्तविक पाहता येत्या 2 तारखेला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याने यामध्ये उमा भारती आणि राजीव प्रताप रुडी यांची गच्छंती अटळ मनाली जात होती. या दोन्ही मंत्र्यांच्या कामकाजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे नाराज असल्याचे बोलले जात होते . या या बड्या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मोदी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते हे पाहण्यासारखं आहे.