सेल्फी काढण्याआधी रस्त्याची योग्य माहिती घ्या! चंद्रकांत पाटलांचा मुंडे आणि पवारांना टोला!

ajit dada and dhanjay munde selfi

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान खुद्द माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटलांना उदगीर मार्गावरील खड्यांसोबत सेल्फी पाठवला आहे होता. निलंगा-उदगीर रस्त्यावर हा सेल्फी काढला असल्याचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं होतो. मात्र बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्ड्यांचे सेल्फी आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद परंतु असे करण्याआधी सदर रस्त्याची योग्य माहिती घ्यायला हवी होती’. अस म्हणत. नाव न घेता अजित पवार आणि धनंजय मुंडेना फटकारले.

“१५ डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची नुसती घोषणाच झाली खड्डे मात्र तसेच आहेत. हल्लाबोल यात्रेदरम्यान सर्वत्र खड्डेच खड्डे आढळुन आले. निलंगा-उदगीर दरम्यान स्वतः अजितदादांनीच धनंजय काढ रे जरा खड्डयांचे सेल्फी अन दे चंद्रकांत दादांना पाठवून असे सांगितले.” अशा आशयाच ट्विट धनंजय मुंडेंनी केल होत.

त्याला उत्तर म्हणून आज चंद्रकांत पाटील म्हणाले, लातूर जिल्ह्यातील निलंगा ते उदगीर मार्गावरील रस्त्यांवरील खड्ड्यांचे सेल्फी आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद परंतु असे करण्याआधी सदर रस्त्याची योग्य माहिती घ्यायला हवी होती. निलंगा ते उदगीर हा जवळपास २९ किमीचा मार्ग असून या मार्गावरील केवळ साडे ३ किमी रस्त्याचे काम बाकी आहे. गेल्या ८ दिवसांपासून सदर रस्त्याचे काम चालू असून ते येत्या ४\५ दिवसात पूर्ण होईल. उदगीर ते निलंगा मार्गावरील औसा, लामजना, लंबोटा, धानेगाव या रस्त्यातील डांबरी पृष्ठभागातील खड्डे व्यवस्थित भरून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचे काम चालू होण्यास विलंब झालेला. दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे फोटो आणि सदर कामाचा नकाशा येथे दाखवला आहे.