इंग्लंडकडुन सर्वाधीक कसोटी खेळण्याचा विक्रम रचण्यापुर्वी अँडरसन भावुक, म्हणाला…

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान इंग्लंडमध्ये भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याआधी न्युझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला आहे. तर दुसरा सामना आजपासुन म्हणजे १० जुनपासुन एजबॅस्टन येथे होणार आहे.

न्युझीलंड विरुद्धचा सामना हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी १६२वा कसोटी सामना ठरणार आहे. यासह अँडरसन हा इंग्लंडकडुन सर्वाधीक कसोटी सामने खेळणारा खेळाडु बनेल. या सामन्याअगोदर दिलेल्या एका मुलाखतीत जेम्स अँडरसन कारकीर्दीबद्दल बोलताना भावुक झाला. ‘कसोटी क्रिकेटची ही १५ वर्षे मी कधीच विसरु शकणार नाही. पहिल्याच सामन्यात कर्णधार नासीर हुसैनने त्याच्या गोलंदाजीवर फाइन लेगला क्षेत्ररक्षक लावले नाही, तसेच पहिलाच चेंडु हा नो बॉल होता. त्यामुळे माझी घबराट उडाली होती. त्यावेळी वाटले नव्हते की मी इथपर्यंत पोहचु शकेन.’

यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की,’भारत, ऑस्ट्रेलिया सारख्या देशाविरुद्ध चांगली कामगीरी करणे म्हणजे आत्मविश्वास मिळवण्यासारखे आहे’. जेम्स अँडरसनने १८ वर्षांपूर्वी २००३ साली झिम्बावे विरुद्ध लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ३८ वर्षीय अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून आता पर्यंत ६१६ गडी बाद केले आहे. न्युझीलंड विरुद्धचा सामना हा जेम्स अँडरसनच्या कारकिर्दीतील १६२ वा कसोटी सामना असेल.

महत्वाच्या बातम्या

IMP