मुंबई : मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि मा. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नसल्याची घनाघाती टीका योगेश खैरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असल्याचा आरोप मनसेकडून वारंवार केला जात आहे. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसत आहेत. मात्र मनसे आणि भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच माणसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक सवाल केले आहेत.
काय म्हणालेत योगेश खैरे?
उद्धवजी उद्या शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींनो म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरे द्या.
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या मा.बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षाशी युती का केली?
PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?
एमआयएम सपा सारख्या पक्षांसोबत दोन-चार मतांसाठी हात मिळवणे का केली?
सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का रोखले नाही?
मस्जिदवरील भुंगे उतरले पाहिजेत हा मा.बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?
मा.बाळासाहेब यांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?
अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?
आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हे कसं सुचलं?
उद्धवजी…. तुम्हाला 'हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' हे म्हणण्याचा आणि मा.बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नाही !@abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @ibnlokmattv1 @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @saamTVnews pic.twitter.com/mZOPvgxAgV
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) October 4, 2022
असे प्रश्न मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरे यांना एका पोस्टच्या माध्यमातून विचारले आहेत. शेवटी ते लिहितात की, “सहाजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार त्यामुळे माझ्या जन्मलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि मा.बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही” अशी घनाघाती टीका योगेश खैरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच होणार, न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ!
- New Car Launch | Aston Martin ची ‘ही’ नवी कार बाजारात लाँच
- Shahaji Bapu Patil | “ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण”; शहाजीबापू पाटील यांची खोचक टीका
- Bike Update | बाईक प्रेमींसाठी ऑक्टोबर महिन्यात येत आहे ‘या’ नवीन टू व्हीलर
- Girish Mahajan | फडणवीसांच्या कानात सांगितल्याचा ‘तो’ दावा एकनाथ खडसेंनी नाकारताच गिरीश महाजनांनी दिलं आव्हान, म्हणाले…