Share

IND vs Pak | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचे रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठं वक्तव्य

IND vs Pak World Cup 2022 नवी दिल्ली : T 20 विश्वचषक 2022 मध्ये आज टीम इंडियाचा आज मोठा सामना होणार आहे. भारत पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे होणार आहे. क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने या सामन्याची  वाट पाहत होते. दरम्यान या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीची मोठी चर्चा सुरु आहे. या मुलाखतीत विराट कोहलीने रोहित शर्मासोबतच्या नात्याबद्दल आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल वक्तव्य केले आहे.

विराट कोहली म्हणाला, “आम्ही दोघांचा खेळ समजून घेण्याची आणि खेळण्याची पद्धत नेहमीच सारखीच राहिली आहे. मोठ्या स्पर्धा कशा जिंकायच्या असा आमचा संवाद नेहमीच असतो, त्यानुसार सर्व नियोजन केले जात आहे. जेव्हापासून मी संघात पुनरागमन केले तेव्हापासून संघातील वातावरण उत्कृष्ट आहे. संघाचे वातावरण चांगले आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः पुढे जाऊन चांगले काम करू इच्छिता. आपल्यातील उणिवा दूर करण्याचा आपला प्रयत्न नेहमीच असतो.”

येथे पाहा आजचा सामना-

T20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 12 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण Disney + Hotstar वर केले जाईल.

दोन्ही देशांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तानी संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद

महत्वाच्या बातम्या :

IND vs Pak World Cup 2022 नवी दिल्ली : T 20 विश्वचषक 2022 मध्ये आज टीम इंडियाचा आज मोठा सामना होणार …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now