पद सोडण्यापूर्वी शास्त्रींचा टीम इंडियाच्या नव्या कोचला गंभीर इशारा

shshtri

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ काही महिन्यात समाप्त होणार आहे. युएईमध्ये आयोजीत आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांचा करार संपुष्यात येणार आहे. यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणत्या खेळाडूची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसोबतच भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्या पदाचा राजिनामा देणार आहेत. त्यानंतर आपल्याला मुदतवाढ नको असल्याचं त्यांनी बीसीसीआला कळवलं आहे. दरम्यान शास्त्रींनी नव्या कोचला गंभीर इशारा दिला आहे. शास्त्री यांनी एका प्रसिद्ध वृत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीयांच्या क्रिकेट वेडाबद्दल सांगितलं आहे.

‘कोरोना असो अथवा नसो त्यांना काही पर्वा नसते. त्यांना फक्त आपण नेहमी तुम्ही जिंकावं अशी अपेक्षा असते. भारतीय क्रिकेट टीमचा कोच होणं हे म्हणजे ब्राझील किंना इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा कोच होण्यासारखं आहे. नेहमी तुम्ही बंदुकीच्या टोकावर असता.

आपण 6 महिने चांगलं खेळल्यानंतर एकदा 36 रनवर ऑल ऑऊट झाल्यास ते तुम्हाला गोळी मारतील. त्यानंतर तुम्हाला लगेच जिंकावं लागेल. माझ्यावर अशा प्रकारच्या टिकेचा काही परिणाम होत नाही. ‘मला हवं ते मी सर्व काही मिळवलं. टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 म्हणून पाच वर्ष राहणे, ऑस्ट्रेलियात दोनदा तर इंग्लंडमध्ये एकदा विजय, हे सर्व माझ्या वर्षांच्या क्रिकेट करिअरमधील सर्वात आनंदाचे क्षण आहेत.’ असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या