Share

Gold Silver Price | दिवाळीपूर्वी सोने-चांदी चे दर झाले स्वस्त, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या सर्वत्र सणासुदीचे वातावरण तयार झालेले आहे. सगळीकडे दिवाळीची Diwali लगबग सुरू झालेली असून खरेदी विक्रीचा जोर देशातील बाजारपेठत वाढला आहे. दरम्यान, लोक सोने-चांदी च्या Gold Silver खरेदीवर प्रचंड गुंतवणूक करताना दिसत आहे. कारण दिवाळीत Diwali सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला असून या आठवड्यामध्ये सोने चांदीच्या दरात Gold Silver Price घसरण झाली आहे.

सोने-चांदी चे दर 

17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान सोन्या चांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवण्यात आली होती. यामध्ये सोन्याचा भाव 368 रुपयांनी कमी झाला होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (INJA) यांच्या अधिकृत वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 50,430 वर येऊन थांबला होता. तर या आठवड्यात सोन्याचा दर 50,062 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा झाला आहे.

त्याचबरोबर चांदीच्या बाजारभावाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या आठवड्यात चांदीचा दर 55,643 रुपये प्रति किलो होता, तर या आठवड्यात चांदीचा दर 55,555 रुपये प्रति किलो वर गेला आहे. चांदीच्या किमतीमध्ये किलोमागे 88 रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. IBJA च्या वेबसाईटवर मिळालेल्या या माहितीमध्ये टॅक्स आणि मेकिंग चार्जेस यांचा समावेश नाही. दरम्यान सोन्या-चांदीच्या भावामध्ये मेकिंग चार्ज आणि टॅक्स जोडल्यानंतर त्यांच्या किमती शहर आणि राज्यानुसार बदलत राहतील.

गेल्या वर्षीपासून या वर्षापर्यंत सोन्याने धनत्रयोदशीला 60% रिटर्न दिला आहे. तर गेल्या वर्षी पासून ते यावर्षीच्या धनत्रयोदशीपर्यंत सोन्याच्या गुंतवणूकदारांना सुमारे 6% रिटर्न मिळाले आहे. तर दुसरीकडे चांदी बद्दल बोलायचे झाले अस चांदीच्या किमतीत 3% पर्यंत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. डॉलरची मजबुती आणि देशात व जगात सातत्याने वाढणारी महागाई हे चांदीच्या किमतीत घट होण्याचे प्रमुख कारण असू शकते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या सर्वत्र सणासुदीचे वातावरण तयार झालेले आहे. सगळीकडे दिवाळीची Diwali लगबग सुरू झालेली असून खरेदी विक्रीचा …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now