खा.मोहिते पाटील आणि निलेंगेकर यांची घरे फोडणारांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे पहावे; धनंजय मुंडे यांची अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेवर टीका

dhananjay mundhe and pankaja munde 2

टीम महाराष्ट्र देशा – विजयसिंह मोहिते पाटील यांचे घर फोडून त्यांच्या भावाला प्रतापसिंह मोहिते पाटील यांना तिकीट दिले, ज्यांनी आमच्यावर घरफोडीचे आरोप केले, ते करण्याआधी स्वतःच्या पक्षाकडे पहिले पाहिजे, अशी अप्रत्यक्ष टीका पंकजा मुंडे यांच्यावर विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. एका वृत्त वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मुंडे यांनी हि टीका केली आहे.

मुंडे यांनी यावेळी राजकारणातील घर फोडीचा आरोप फेटाळत, त्यांनी भाजपच्या राजकारणावरच टीका केली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील, संभाजी पाटील निलेंगेकर यांची घरे फोडणारांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे पहिले पाहिजे. यासह महाराष्ट्रातील अनेकांची ज्यांनी घरे फोडली त्यांनी आमच्यावर टीका करण्या आधी स्वतःच्या पक्षाकडे पहिले पाहिजे, असे मुंडे यावेळी म्हणाले.

कुणाचं घर फोडून राजकारण करू नये असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना बीड येथील कार्यक्रमात लगावला होता. त्यावरून धनंजय मुंडे यांनी भाजपच्या राजकारणावरच टीका केली आहे.